दिपक गणेशराव तारे हे दि.२४ ते २५ डिसेंबर २०१७ दरम्यान खासगी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व नगदी १० हजार रुपये असा एकूण एक लाख ५० हजार १६४ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.रविवारी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी शेख जावेद शेख हबीब या भंगार विक्रेत्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने शहरातील गौरवनगर, तथागतनगर, फरांदेनगर, श्रीनगर, आशीर्वादनगर आदी भागात घरफोड्या केल्याची कबूली दिली.त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने व नगदी दहा हजार रुपये असा एकूण ३७ हजार ९५१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews